भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केल्या सहवेदना..
⚡वेंगुर्ला ता.०८-: चिपळूणमध्ये आयशर टेम्पोची उभ्या कंटेनरला धडक बसून वेंगुर्लेतील दोघे युवक ठार झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दोघा युवकांच्या परिवारासह वेंगुर्ले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे
मुंबई गोवा महामार्गावरील कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेंनरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसल्याने या अपघातात वेंगुर्ले शहरातील भटवाडी-किनळणे येथील आयशर चालक ऋत्विक शिरोडकर आणि वेंगुर्ले परबवाडा येथील रामचंद्र (रामा) राजेंद्र शेणई या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पोच्या केबिनचा यात चक्काचुर झाला आहे.
या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत विशाल परब यांनी या दुःखात मृत युवकांच्या परिवारावर कोसळलेल्या या दुःखात भारतीय जनता पार्टी सहभागी असल्याचे म्हंटले आहे.
