संकटे येत जात असतात, एकत्र उभे राहिलो तर सगळ्यावर निश्चित मात करू…

विशाल परब: पावसामुळे घर कोसळून नुकसान झालेल्या निगुडेतील कार्यकर्त्याला भाजपच्या माध्यामातून आर्थिक मदतीचा दिला धीर…

⚡बांदा ता.०९-: सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना नुकसानाला आणि संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे येतील जातील, पण आपण एकदिलाने एकत्र सामोरे गेलो तर त्याची झळ जाणवणार नाही. तुमचा सहकारी मित्र म्हणून अडचणीच्या वेळी तुमच्यासोबत राहणे हे मी माझे कर्तव्यच मानतो आणि राजकारणापलीकडे जात मी ते नेहमीच करत राहीन असे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी म्हंटले आहे. पावसामुळे घर कोसळलेल्या निगुडेचे माजी सरपंच दिनेश राणे यांना भेट देत भाजपा कार्यकर्त्यांनी धीर दिला, त्याप्रसंगी ते बोलत होते. कोसळलेले घर सावरता यावे यासाठी विशाल परब यांनी दिनेश राणे यांना काही आर्थिक मदतही यावेळी केली.

विशाल परब हे सातत्याने ज्या पद्धतीने लोकांच्या संकटात, अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहात आहेत, त्याचे समाजात अनेकजण कौतुक करत आहेत. निगुडे ग्रामस्थांनीही यावेळी विशाल परब यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

या भेटीच्या वेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासोबत निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर, औदुंबर पालव, आशिष झाट्ये व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page