मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे.
ही स्पर्धा पाचवी ते दहावी अशा एका गटात होणार आहे. विजेत्यांना ३००१, २००१, १००१ रुपये तसेच चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रत्येक संघात वाद्यवृंदासह कमीत कमी सात, तर जास्तीत जास्त १५ स्पर्धक असावेत. सादरीकरणासाठी दहा मिनिटे कालावधी आहे. सहभागी संघांनी वाद्यवृंदाची व्यवस्था स्वतः करावी. सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे सौगंधराज बादेकर (९४२००२२८९०) यांच्याकडे द्यावीत. या स्पर्धेत शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव मनोज चव्हाण यांनी केले आहे.
