सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेत ओजस्वी साळुंके, पार्थ सामंत, सम्राट राजे प्रथम…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण नगर वाचन मंदिरच्यावतीने घेण्यात आलेल्या सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात ओजस्वी कैलास साळुंके (टोपीवाला हायस्कूल), आठवी ते दहावी गटात पार्थ प्रदिप सामंत (टोपीवाला हायस्कूल), अकरावी व बारावी गटात सम्राट बाबुराव राजे (टोपीवाला हायस्कूल) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.

या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – पाचवी ते दहावी गटातील विजेते प्रथम – ओजस्वी कैलास साळुंखे (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय स्वरा रुपेश बांदेकर (भंडारी हायस्कूल), तृतीय अस्मि अशोक आठलेकर (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम रुचा रामचंद्र चव्हाण (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक वीरा श्यामसुंदर वारंग (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ सर्वेश संजीव परुळेकर (टोपीवाला हायस्कूल).

आठवी ते दहावी गटातील विजेते स्पर्धक- प्रथम पार्थ प्रदिप सामंत (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय संस्कृती मंगेश नाईक (टोपीवाला हायस्कूल), तृतीय- वेदांत अमित नाईक (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम दिया दत्तात्रय गोलतकर (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (माळगाव हायस्कूल), तृतीय रौशन कैलास साळुंके (टोपीवाला हायस्कूल).

अकरावी व बारावी- प्रथम सम्राट बाबुराव राजे (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय क्रमांक स्वरुप लक्ष्मण वळंजू (टोपीवाला हायस्कूल), तृतीय वैश्विका नागेश कदम (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम धनश्री सखाराम शेटवे (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय यशश्री बबन पवार, उत्तेजनार्थ तृतीय सिध्दी किशोर पाटणकर (टोपीवाला हायस्कूल).

स्पर्धा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन करुन आणि सौ. विंदा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरणप्रसंगी कार्यवाह नागेश कदम, प्रकाश कुशे, परिक्षक अमित खोत, संग्राम कासले, रविंद्र वराडकर, विनायक कोळंबकर, शिवराज सावंत, देणगीदार रामकृष्ण जोशी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page