सह्याद्री फाउंडेशनचा मान्सून महोत्सव २७ जुलैपासून…

संजू परब: जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचा ही केल आवाहन..

⚡सावंतवाडी, ता. २५-: २७ जुलै पासून सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मान्सुन महोत्सवातील रानभाजी आणि अभंग गायन स्पर्धेसाठी ५ हजार, ३ हजार आणि २ हजार अशी विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जास्तीत- जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून आज येथे करण्यात आले.

दरम्यान या महोत्सवाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सुदृढ बालक स्पर्धा, स्पर्धक व मान्यवरांचा सत्कार, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर महोत्सवाचा समारोप कुर्मादासाची वारी या दशावतार नाटकाने होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे त्यांनी सांगितले. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ, विद्यमान अध्यक्ष रविंद्र मडगावकर, प्रताप परब, शशिकांत मोरजकर, सुहास सावंत, अशोक सांगेलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page