पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पाईपलाईनचे काम दोन दिवसात मार्गी लावल्याने बबन साळगावकरांकडून कौतुक…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर झाड पडल्याने पाईप लाईन फुटली होती. एकदम अडचणीच्या ठिकाणी ही पाईप लाईन फुटल्याने तिथे जाऊन कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन दुरुस्ती करणे खूप कठीण काम होते. तरी देखील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी हे काम दोन दिवसात मार्गी लावल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भाऊ भिसे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

दरम्यान त्यामूळे आज पासून कमी जास्त प्रमाणात शहराला पाणीपुरवठा सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page