सावंतवाडी ता.१३-: आझाद मैदान येथे आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत येणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या आंदोलनानिमित्त माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन, समस्या जाणून घेत आवश्यक काय उपाययोजना करता येतील याबद्दल सकारात्मक चर्चा केली.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. उषा नेरूरकर, जिल्हा सचिव सौ. रूपा चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख सौ. प्रिया नाईक, जिल्हा कर्मचारी अध्यक्ष श्री. अमोल कावले, सौ.सायली कासले, जिल्हा कोशाध्यक्ष अभिजित
उपस्थित होते.
