मेढा येथे केक बनवीणे प्रशिक्षण सुरु…

रणरागिणी महिला संस्थेचे आयोजन स्मृती कांदळगावकर यानी केला शुभारंभ

*💫मालवण दि.०२-:* रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवणच्या वतीने मालवण मेढा येथे सौ. विद्या फर्नांडिस यांच्या निवासस्थानी तीन दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सौ. स्मृती महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नीलम शिंदे, सौ. विद्या फर्नांडिस, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात सौ. श्वेता सावंत व कु. साहिल सावंत हे केक बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात गीता आचरेकर, सौ. दीक्षा गावकर, सौ. प्रांजल गोसावी, सौ. अर्चना मेस्त्री, साक्षी लाड, प्रसाद हडकर व इतर सहभागी झाले आहेत. कोरोना विषयक शासन नियम पाळून हे प्रशिक्षण पार पडत आहे.

You cannot copy content of this page