त्यामुळे शासनाचा पैसा कोणाच्या घशात गेला ? त्याचा खुलासा करावा:बांधकाम सभापती विवेक रावराणे..
⚡वैभववाडी ता.०६-: वैभववाडी शहराचे विरोधी नगरसेवक हेच वैभवाडी नगरपंचायतीच्या कामाचे ठेकेदार आहेत रणजित तावडे हे विसरले आहेत की आज पर्यंत वैभववाडी शहरात त्यांनी अशा पद्धतीचे छुपे ठेकेदारीच्या माध्यमातून किती ठिकाणी कामे केली आहेत ती कामे करताना हा शासनाचा पैसा कोणाच्या घशात गेला? याचा पहिला खुलासा उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे त्याने करावा असा सवाल दिलेल्या निवेदनातून न प चे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी केला आहे.
दिलेल्या निवेदनातून रावराणे असे म्हणाले की विरोधी नगरसेवक रणजीत तावडे हे सातत्याने उल्लेख करतात की सत्ताधाऱ्यांमार्फतच ठेकेदारी केली जाते वैभववाडी शहराचे नेते हेच वैभववाडी शहराचे ठेकेदार आहेत परंतु परवा पत्रकार परिषदेमध्ये तावडे यांच्या तोंडून सत्य बाहेर पडले आहे त्यांनी कबूल देत असे म्हणाले की निविदा प्रक्रियेस विलंब झालेल्या चे कारण म्हणजे विरोधी नगरसेवकांच्या कंत्राटदारांनी भरलेल्या निविदा आणि काम कोणाच द्यायचे याबद्दल असलेल्या वाद सदरहु वाक्य वापरत असताना रणजीत तावडे असे म्हणतात की विरोधी नगरसेवकांद्वारे ही निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला गेलेला आहे म्हणजेच काय तर वैभववाडी शहराचे विरोधी नगरसेवक हेच वैभववाडी नगरपंचायतीच्या कामाचे ठेकेदार आहेत हे सत्य बाहेर पडली. वैभवानीच्या सुध्या जनतेस आज मी इतकच सांगू इच्छितो की विरोधी नगरसेवक हेच वैभववाडीच्या ठेकेदारीचा भाग आहे. त्यांच्या वक्त्यावरून हे स्पष्ट झाले आहे. असं विवेक रावराणे यांनी निवेदनातून केला आहे.
