वैभववाडी प्रतिनिधी-:राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या आयुष नाळे, तनिष्का बुराण, वेदांत सरकटे व ओम शिंदे या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय केंद्र शासन व राज्य शासनाच्या च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना़चा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस बी शिंदे, लिपिक पी.पी.कोकरे आदी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
