सेवांगणच्या शिष्यवृत्ती वर्गातील आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

⚡मालवण ता.०५-:
शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ च्या गुणवत्ता यादीमध्ये मालवण तालुक्यातील इयत्ता ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहर विभागातील ११ विद्यार्थी आणि ग्रामीण विभागातील ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये बॅ. नाथ पै सेवांगणच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गामधील मालवण विभागातून ६ तर कट्टा शाखेतून २ अशा आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

शहर विभागातील : कु. लेईशा पराडकर, २४६ गुण (तालुक्यात पहिली व जिल्हयात आठवी), कु. सोहम गवाणकर, २३४ गुण (तालुक्यात दुसरा जिल्ह्यात १५ वा), कु. स्वरीत कोल्हे, २१६ गुण ( तालुक्यात ३रा व जिल्हयात २३ वा), कु. स्वरा बांदेकर, १९४ गुण (तालुक्यात ८ वी व जिल्ह्यात ५३ वी) कु. मंतसा ख़ान, १९४ गुण (तालुक्यात ९ वी जिल्ह्यात ५४ वी), कु. मीरा वराडकर, १८८ गुण (तालुक्यात ११ वी व जिल्हयात ६० वी). ग्रामीण विभागातील कु. काव्या अभिमन्यू मेस्त्री, (२२४ गुण व तालुक्यात पहिली) आणि कु. मनस्वी शैलेश परब, (१९६ गुण व तालुक्यात दुसरी.)

सेवांगण मालवणच्या शिष्यवृत्ती वर्गाचे हे दुसरे वर्ष असून २ वर्षात १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सेवांगण कट्टा शाखेचे हे २४ वे वर्ष असून या २४ वर्षात १५६ विद्यार्थी गुणवत्ता धारक ठरले आहेत. जुलै महिन्यात शुभारंभ होवून हा वर्ग जानेवारी पर्यंत दर शनिवारी व रविवारी सुरू असतो. विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शना बरोबरच सराव परीक्षा घेतल्या जातात. या विद्यार्थ्यांना मालवण येथे मनाली वेंगुर्लेकर व कट्टा येथे मनोज काळसेकर या प्रमुख मार्गदर्शकांसह इतरही काही शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व गुणवंतांचे सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, अध्यक्ष शाम पावसकर, कार्यवाह वैष्णवी लाड, ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page