⚡बांदा ता.०५-: जून महिन्यात सर्व शाळा सुरू झाल्याने लहानलहान मुले रस्त्याच्या बाजूने शाळेत चालत जातात. त्यांना रस्ता सुरक्षेबाबत ज्ञान नसते. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहने सांभाळून चालवण्याचे आवाहन, दोडामार्ग पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी केले आहे.
श्री. जाधव म्हणाले की, पावसाळा असल्याने रस्त्यावरील पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडणार नाही याची खबरदारी वाहनचालकाने घ्यावी. तसेच अचानक लहान मुले रस्त्यावर आल्यास दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्या. रस्ते निसरडे बनत आहेत त्यामुळे आपल्यासह दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन दोडामार्ग पोलिस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी वाहनचालकांना केले आहे.