⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे ) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ येथील इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलच्या शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये पार्थ विश्वास धुरी याने 21 वा क्रमांक व ऋग्वेद राघो ( प्रणिल) नाईक यांने 30 वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल या प्रशालेचे एकूण 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच गुणवत्ता यादीत आलेले पार्थ धुरी व ऋग्वेद नाईक या दोन विद्यार्थांचा प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या हस्ते पुषपगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रशालेचे शिक्षक भगवान केळुसकर, शिक्षिका पूर्वा राऊळ , भावना धुरी, स्नेहा परुळेकर, पूजा खानोलकर व तन्वी सावंत यांचे शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख व मार्गदर्शक शिक्षकांचे कमशिप्र मंडळ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक विश्वास धुरी व साळगाव प्राथमिक शाळा क्र 3 च्या सहायक शिक्षिका विभा धुरी यांचा पार्थ हा मुलगा, तर नेरुरपार येथील व्यावसायिक प्रणिल नाईक व कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सोनाली नाईक – पाटकर यांचा ऋग्वेद हा मुलगा होय.
