देवगड बर्वे ग्रंथालयात पावसाळी काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन…

⚡देवगड ता.२४-: देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता पावसाळी काव्यवाचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काव्यवाचनात कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छुक स्पर्धकांनी आपल्या आवडीच्या दोन कवितांचे वाचन करायचे आहे. यातील एक कविता पाऊस या विषयावर आणि दुसरी अन्य कोणत्याही विषयावरील असावी. सहभागी मंडळींना ग्रंथालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तरी इच्छुकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page