⚡देवगड ता.२४-: सामाजिक बांधिलकीतुन सामाजिक कार्यकर्ते तथा पंचायत समिती देवगडचे हवालदार यांनी श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट दिला . यावेळी प्रमुख उपस्थिती माजी.आमदार अजित गोगटे,मुख्याध्यापक हिराचंद तानवडे सर, भगिरथ प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, संस्था चेअरमन ओ. डी के पडेलकर,आत्तार सर, चव्हाण सर, मिलिंद पाटणकर सर, जाधव सर, प्रसाद पाटणकर सर, मंगेश तानवडे सर, शेलटकर सर, काळसेकर सर आणि बागुल व अजित तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते .
रमेश चव्हाण यांचा कला , क्रिडा , सांस्कृतिक कार्यक्रमातही चांगला सहभाग असुन त्यांनी HIV + मुलगा दत्तक घेऊन पालकत्व केले . तसेच ३२ वेळा रक्तदान केले असुन त्यांचा रक्तदान शिबीर आयोजन करण्यातही मोठा सहभाग असुन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्राण वाचवणे , तसेच क्रिकेट स्पर्धामध्येही विनामुल्य पंच म्हणून गेल्या ३५ वर्षे काम करीत आहेत त्यांच्या या समाजिक कार्याचा गौरव करत श्रीराम माध्यमिक विदयामंदीर पडेलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी कौतुक करत त्यांचे शाळेमार्फत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण यांची श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलला संगणक संच भेट…
