उद्या, परवा पाणी पुरवठा राहणार बंद सावंतवाडी न प च्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरु
*💫सावंतवाडी दि.३१-:* शहराला पाणीपुरवठा करणारी केसरी येथील पाईप लाईन फुटल्याने चिकार टेकडी वरील पाण्याच्या टाकीतून शहरातील काही भागात होणारा पाणीपुरवठा १ आणि २ एप्रिल रोजी बंद राहणार आहे. या पाईप लाईन चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यावेळी सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकोंड, सिक्वेरावाडा, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकरटेंब, कॉटेज हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हदळभाट, कामत लाईन, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, चराठे, ग्रामपंचायत आदी ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
