सावंतवाडी सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात…?

उत्सुकता शिगेला:उद्या आहे निवड:भाजप नेते नारायण राणेंच्या निर्णयाकडे लक्ष

*💫सावंतवाडी दि.३१-:* पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक उद्या गुरुवार दिनाक 1 एप्रिल रोजी होणार असून, सभापती पदावरुन खलबते रंगु लागली आहेत. एकुणच भाजप मध्ये काहीसे नाराजीचे सूर उमटत असल्याचे चित्र दिसत असून, नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी भाजप नेते तथा खासदार नारायण राणे कोणाच्या गळ्यात सभापतीची माळ टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. मानसी धुरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक उद्या होत असून, याठिकाणी सभापती पदाचे आरक्षण महीलांसाठी ओपन असल्याने याठिकाणी सभापती पदासाठी सक्षम चेहरा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत मुळ भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या प्राजक्ता केळुस्कर व राणे समर्थक असलेल्या सुनंदा राऊळ यांचे नाव सभापती पदासाठी पुढे येत आहे. तर दुसरीकडे उपसभापती पद भोगलेल्या निकीता सावंत व सभापती पदावरून आत्ताच पायउतार झालेल्या मानसी धुरी यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र याठिकाणी एकदा संधी मिळाल्यानंतर पुन्हा त्याच चेहऱ्यांना संधी का ? अशी काहीची मते आहेत तर सभापती आरक्षण हे ओपन असल्याने ओपन मधीलच महीला सभापती झाली पाहीजे असेही काहीचे मत आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत संजना सावंत याना पुन्हा एकदा अध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने याठिकाणीही तशी संधी पुन्हा मिळू शकणार अशी शक्यता काहीजण बांधुन आहेत. त्यासाठी राजकीय खलबते रंगु लागली आहेत. तसेच उपसभापती पदावरुनही सभापती पद कोणाला द्यावे याचेही समीकरण ठरणार आहे. राणे समर्थकांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडल्यास उपसभापती पद हे मुळ भाजप सदस्याकडे जाणार आहे उपसभापतीसाठी बाबु सावंत तर संदिप गावडे याच्या नावाची चर्चा आहे. सभापती पदासाठी प्राजक्ता केळुस्कर व सुनंदा राऊळ या दोघी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सभागृहातील अभ्यास करता प्राजक्ता केळुस्कर या सभापती पदासाठी काहीशा उजव्या आहेत. परंतु सभापती व उपसभापती यावरुन आत्ताच चर्चा रंगु लागली असुन, सावंतवाडी याबाबत सदस्याना घेऊन बैठका रंगु लागल्या आहेत. मात्र कितीही बैठका झाल्या तरी शेवटी नारायण राणे ज्या नावावर शिक्कामोर्तब करणार त्याच्याच गळ्यात सभापतीची माळ पडणार हे तितकेच सत्य आहे.

You cannot copy content of this page