सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वारंवार फुटण्यामागे ‘संशय’…

अनधिकृत कनेक्शन दिल्याने हा प्रकार घडत आहे; सेना प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ परुळेकर

*💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी शहराला केसरी येथून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेले पंधरा दिवसात दोन वेळा फुटली आहे. ही पाईपलाईन कशी फुटे याबाबत शिवसेना प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून, ही पाईप लाईन फुटण्यामागे संशय प्रसिद्ध पत्रकातून व्यक्त केला आहे. सावंतवाडी शहरात चार हजार मिलिमीटर चा पाऊस पडत असताना देखील सावंतवाडी शहरात पाणी कपात व पाणी टंचाई कशी काय होते असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच अनधिकृत रित्या पाणी कनेक्शन दिल्याने ही पाईप लाईन फुटल्याचे त्यानी संशय व्यक्त केला असून, याची सखोल चौकशी करण्याची त्यानी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page