संघर्ष समितिची स्वाक्षरी मोहिम सुरु; समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका
कणकवली दि.३१-: सद्गुरु भालचंद्र महाराज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.३ स्थलांतर व हस्तांतरण विरोध आहे.शाळा व्यवस्थापन समितीचा इमारत जीर्ण झाल्याबद्दल दुरुस्ती ठराव मांडला का?शाळा व्यवस्थापनला विश्वासात घेतले नाही.शाळेसाठी आंदोलन करणाऱ्यावर आरोप करणाऱ्या लोकांनी जाणून घेतले का?आरोप कश्याच्या आधारे आरोप केले आहेत?आमचा विरोध कायम राहील,असा इशारा शाळा बचाव संघर्ष समितीच्यावतीने नामानंद मोदक,संजय मालांडकर यांनी दिला आहे.तसेच समर्थनासाठी सह्याची मोहीम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. कणकवली पाटकर कॉम्प्लेक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्राथमिक शाळा बचाव संघर्ष समितीचे विष्णू राणे,बाळकृष्ण कांबळे,सायली राणे, दिलीप मालांडकर, गणपत मालांडकर, प्रशांत गवई, रवि सावंत,अमित मांडवकर, सुरेश राणे,अनिल अणावकर,विवेक पाटकर,सुमित पाटकर, रंजना पाटकर आदी उपस्थित होते. शाळा अस्थिर करण्याचा हेतू काय? जवळच्या हायस्कूलचा प्राथमिक विभाग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ही शाळा अस्थिर केली का?आमचा देवस्थानला विरोध नाही,शाळा तिथेच राहुदेत ही आमची भूमिका आहे.तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या आहे.शहरात अवस्था पाहता अनेक शाळा बंद पडल्या आहेत.शाळा बंद कराण्याचा घाट आहे,आम्हाला विश्वासात न घेता करत असल्याने आमचा विरोध आहे.सर्वांना विचारुन करा,असे नामानंद मोडक यांनी सांगितले. भालचंद्र महाराज भक्त निवास बांधायचा असेल,तो पुढे बांधावा, आमदार,खासदार निधी देत असेल,तर ही शाळा दुरुस्ती करावी.आम्ही त्याला समर्थन देऊ,असे संजय मालांडकर यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीला गेल्या ४ वर्षात विश्वासात न घेता हा निर्णय घेतला जात आहे.कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.त्यामुळेच ही शाळा आहे,तिथेच राहावी अशी आमची भूमिका आहे.ही जागा देणारा माणूस हा हमाली करणारा होता.शाळेसाठीच ही जागा वापरावी हे त्याचे मत आहे,असे रवी सावंत यांनी सांगितले.
