वैश्य समाजातर्फे 16 जून रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡कणकवली ता.०९- : वैश्य समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समाजातर्फे रविवार 16 जून रोजी दुपारी 3.30 वाजता येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला पालक व समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर, सचिव गुरुनाथ पावसकर यांनी केले आहे.


दहावी परीक्षेत 80 टक्के, बारावी परीक्षेत 70 टक्के गुण मिळवलेल्या आणि पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गुणप्रतिकेची झेरॉक्स 15 जूनपूर्वी झेंडा चौकातील निवृत्ती धडाम यांच्या दुकानात जमा करावी. गुणगौरव सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी नीलम धडाम (9423884416), विलास कोरगावकर (9422381667) यांच्याकडे संपर्क साधावा.

You cannot copy content of this page