संजू परब यांच्याकडून स्वागत; राणेंनी मानले सावंतवाडीकरांचे आभार..
⚡सावंतवाडी ता.०९-: नारायण राणेंच्या विजयानंतर निलेश राणे प्रथमच आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी श्री परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान राणेंच्या विजयात सावंतवाडीकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल श्री राणी यांनी तमाम सावंतवाडीकरांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत सत्यवान बांदेकर विनोद सावंत गुरु मटकर सिद्धार्थ भांबुरे आदी उपस्थित होते.
