शेर्ले ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…

*💫बांदा दि.३०-:* अष्टविनायक तरुण मित्रमंडळ, शेर्ले, एस. आर. ग्रुप शेर्ले आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते दुपारी १२ या वेळेत शेर्ले ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी विद्याधर नाईक, सरपंच जगन्नाथ धुरी, तानाजी धुरी, अजय आरोसकर, श्याम सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व ५० किलो पेक्षा अधिक वजन असलेल्या जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सरपंच जगन्नाथ धुरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page