जिल्ह्यात 14 एप्रिल पर्यंत मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 30 : जिल्ह्यात होणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीप्रमाणे) रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे, गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजा मास प्रारंभ इ सण, उत्सव या निमित्ताने आयोजित कार्यक्रम व आगामी होऊ घातलेल्या निवडणूका तसेच होणारी उपोषणे, मार्चे, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (अ) ते (फ) आणि 37 (3) प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त झआलेल्या अधिकारांचा वापर करून दि. 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचा भंग केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

You cannot copy content of this page