⚡कणकवली ता०८-: मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टची बैठक येथील विद्यामंदिर प्रशालेत पार पडली. यात ट्रस्टच्या शैक्षणिक मंडळातर्फे वर्षभरात राबविण्यात येणार्या शैक्षणिक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर, ट्रस्टच्या शैक्षणिक मंडळाचे चेअरमन अच्युतराव वणवे, व्हाइस चेअरमन नारायण राणे, सचिव मोहन कुंभार, सदस्य श्री. पारकर यांच्यासह शैक्षणिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 22 जूनला घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे महत्व, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी शब्द पाठांतर, शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षाप्रमुख म्हणून राजाभाऊ मुंढे यांची तर स्पर्धा परीक्षाप्रमुख म्हणून मोहन कुंभार यांची निवड करण्यात आली.
मुरकर ट्रस्टच्या बैठकीत शैक्षणिक कार्यक्रमांवर चर्चा…
