ओझर ते मसुरे मुख्य मार्गांवरील वाहतूक दहा दिवस बंद राहणार…

⚡मालवण ता.०८-: ओझर कांदळगांव मसुरे मार्गांवरील तळाणी येथील पुलाचे काम पुर्ण झाले असून प्रगतीपथावर असणाऱ्या पोच मार्गाच्या कामांसाठी ओझर ते मसुरे मुख्य मार्गांवरील वाहतूक दहा दिवस बंद करून कांदळगांव आंगणेवाडी मार्गे वळवण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिली आहे.

ओझर कांदळगाव मार्गावरील पुलाचे मुख्य काम हे भौतिक दृष्ट्या पूर्ण झाले असून पोच मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. सदारचे काम करताना तात्पुरता वळण रस्ता (Diversion) तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काम होईपर्यंत पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. तरी या ओझर कांदळगाव प्र. जि. मा.52 मार्गावरील ओझर ते मसुरे दरम्यानची वाहतूक पुढील १० दिवस बंद करून ही वाहतूक आंगणेवडी मार्गावरून वळवण्यात यावी. सहकार्य करावे. असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page