व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडरपदी अक्षता कांबळी…

⚡कणकवली ता.०८-: नशाबंदी मंडळाची तीन दिवसीय वार्षिक नियोजन बैठक वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. या बैठकीत व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रॅंड अॅम्बेसेडकर म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, विनायक जोशी, पत्रकार महेश सरनाईक, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक तथा चिटणीस अमोल मडामे, कार्यकरिणी सदस्य बॉस्को डिसोजा, रुपेश गीरा, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, प्रा. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते. बैठकीला ३६ जिल्ह्यातील संघटक, जिल्हा प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र मुंबरकर, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर व कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page