आंबोली राघवेश्वर येथे राम मंदिर संरक्षण भिंत गाडीवर कोसळली…

आंबोली,ता.८ : येथील राघवेश्वर मठ येथे राम मंदिर बांधकामाची संरक्षक भिंत कोसळली.यात शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीवर दगड कोसळल्यामुळे नुकसान झाले.ही घटना रात्री 9 वाजता घडली.दर शनिवारी प.पू.भारतदास महाराजांच्या मठात सत्यनारायणाची पूजा असते.दर शनिवारी पश्चिम महाराष्ट्र तसेच ठिकठिकाणाहून भाविक भक्त येत असतात.आज पहिल्या च मुसळ धार पावसात भिंत कोसळली.या ठिकाणी राम मंदिर जीर्णोद्धार आणि सभामंडपाचे काम सुरु आहे. शिरूर येथील कुटुंबीय आज पूजेनिमित्त मठात आले होते.गाडी पार्किंग केलेली असताना घटना घडली.

You cannot copy content of this page