जल जीवन कामांची चौकशी करा…

भाजपच्या एकनाथ नाडकर्णी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

ओरोस ता ७
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील असलेली जल जीवन मिशन ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजनेची कामे सुरू आहेत. परंतु यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ठेकेदार व अधिकारी यांचे योग्य नियोजन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचा बोजवारा उडाला आहे, असे खदपूर्वक आपल्याला सांगावे लागत आहे. पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी ग्रामीण भागात या योजनेचे महत्त्व अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जल जीवन योजनेच्या कामाची चौकशी व्हावी. ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे ही कामे अपुरी असल्याने आपल्या स्तरावरून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

You cannot copy content of this page