प्रभाग २ मिळालेलं यश हे बाबू कुडतरकर यांच्यामुळे नसून हे सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच…

निशू तोरसकर यांचा पलटवार:एकट्याने श्रेय घेऊन घटकपक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर ओढवून घेऊ नये..

⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातून महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांना सर्वाधिक मताध्यकीय हे दोन नंबर प्रभागात मिळाले त्याचे श्रेय हे निव्वळ शिंदे गटाचे अथवा बाबू कुडतरकर यांचे नसून हे यश प्रचारात सामील झालेल्या महायुतीतील सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. असा पलटवर भाजपाचे पदाधिकारी निशू तोरसकर यांनी केला आहे.

दरम्यान एकट्याने श्रेय घेऊन युतीतील इतर घटकपक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर ओढवून घेऊ नये आपल्याला आगामी काळात पुन्हा एकत्रित निवडणूका लढवायच्या आहेत याची जाणीव ठेऊन यापुढे स्टेटमेंट करावी असे ही श्री तोरस्कर यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे. तसेच प्रभागातील भाजप शिंदे गट व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाचं हे फलित असून त्यांची मी मनापासून त्यांच आभार मानतो असेही त्यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page