पाट हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर…

इको क्लबच्या तर्फे आयोजन..

⚡कुडाळ ता.०७-: पर्यावरणाचे महत्त्व माहिती होण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. वृक्षदिंडी, पक्षी निरीक्षण, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान असे उपक्रम तर दरवर्षी पाट हायस्कूलमध्ये आयोजित करून मुलांना पर्यावरणाविषयी जागरूकता आणली जाते.
इको क्लब ऑफ मिशन लाईफ या शासनाच्या उपक्रमांतर्गत स्कूलमध्ये 5 जून ते 11 जून या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक राजन हंजनकर, इको क्लब प्रमुख संदीप साळसकर, सौ यज्ञा साळगांवकर, सौ दीपिका सामंत, सौ जान्हवी पडते, गुरुनाथ केरकर, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी यज्ञा साळगावकर यांनी रानभाजीचे महत्व त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीचे महत्त्व याची माहिती मुलांना सांगितली. तर शाळेमध्ये यावर्षी जे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत त्याविषयी माहिती मुख्याध्यापक हंजनकर दिली. यावेळी चंद्रपूर येथील ताडोबा उद्यान सफर ही व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. दुसऱ्या दिवशी बिया संकलन आणि त्याचे रोपण तर तिसऱ्या दिवशी मशागत आणि साफसफाई असे उपक्रम घेण्यात आले.
यापूर्वी जे विविध उपक्रम घेण्यात आले त्यांचे फोटो ही स्क्रीनवर मुलांना दाखविण्यात आले. शेवटी संस्थाचालक आणि सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page