⚡कुडाळ ता.०७-: पाट हायस्कूलमध्ये जे शैक्षणिक विविध उपक्रम चालू आहेत यामध्ये डिजिटल अभ्यासिका, कलादालन, अटल टिंकरिंग लॅब, गणित विषयक विविध उपक्रम, मराठी विषयक विविध उपक्रम हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या समोर जात असतात. त्यामुळे सन 1995 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी यांनी शाळेतील वर्गांची गरज ओळखून सात फॅन भेट दिले व इतरही उपयुक्त साहित्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी विद्यार्थी विनोद मेतर, अविनाश चौधरी, श्रीमती नयना म्हापणकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, संस्था संचालक राजेश सामंत श्री आंबेरकर, सौ पूर्वा नाईक, सुधीर देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थाचालकांच्या वतीने सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.
पाट हायस्कूलला 1995 च्या दहावी बॅच तर्फे सात फॅनची भेट…
