देवगड खाडीत पडून खलाशाचा मृत्यू…

⚡देवगड ता.०६-: देवगड बंदर येथे नौकेवरून पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी १२:३० च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड बंदरात मच्छीमारी व्यवसायासाठी मालवण गवंडीवाडा येथील रॉकी पीटर डिसोजा वय ४२ यांची नौका आहे.या नौकेवर कामाला असलेले खलाशी यमतुरप्पा गिरीअप्पा कडगाली वय 22 (मूळ राहणार मलकसमुद्र यलदुर्गा कर्नाटक) सध्या राहणार देवगड हा रात्री नौकेवर झोपला असताना रात्री साडेबाराच्या सुमारास लघुशंका करत असताना नौकेवरून तोल जाऊन पाण्यात पडला. त्याची शोधाशोध केली मात्र तो कुठे सापडला नाही. गुरुवार ६ जून रोजी दुपारी 12:30 च्या दरम्याने त्याचा मृतदेह देवगड खाडी येथे तरंगताना आढळून आला. याबाबतची खबर नौका मालक रॉकी पिटर डिसोजा यांनी देवगड पोलिसात दिली. देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.

You cannot copy content of this page