गोगटे व राणे दोन्ही आजी माजी आमदारांना उचलून कार्यकर्त्यांनी केला आपला आनंदोत्सव साजरा..
⚡देवगड ता.०६-: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून जनतेने महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना खासदार म्हणून निवडून संसदेत पाठवले.या मताधिक्यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्याने मोठ्या प्रमाणात मताधिक्य नारायण राणे यांना दिले आहे . त्यामुळे देवगडमध्ये मिरवणूक काढून नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजयाचा आनंदोत्सव देवगड जामसंडे शहरात डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.
या मिरवणुकीमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासह माजी आमदार अँड अजित गोगटे, बाळा खडपे,जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ अमोल तेली, जिल्हा व तालुका भाजपा पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते या मिरवणुकीत मध्ये सहभागी झाले होते. देवगड जामसंडे ग्रामदेवता श्री दिर्बादेवी
मंदिराकडे या रॅलीची सुरुवात झाली .जामसंडे बाजारपेठ, देवगड कॉलेजरोड, मांजरेकर नाका, देवगड एसटी स्टँड या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता देवगड एसटी स्टँड येथे करण्यात आली.या मिरवणुकीदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी मांजरेकर नाका देवगड एसटी स्टँड या ठिकाणी आमदार नितेश राणे यांना उचलून घेत जोरदार जल्लोष साजरा करत . बाप तो बाप रहेगा अशा घोषणा दिल्या डीजेच्या तालावर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मात्र चांगला ठेका धरला होता. चूक पोलीस बंदोबस्तात ही मिरवणूक काढण्यात आली कुठल्याही वाहनाला कोणत्या प्रकारेही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलिसांनी तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी घेण्यात आली होती.
