महायुतीला सर्वाधिक मत बाबू कुडतरकर यांच्या प्रभागातून; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक…
⚡सावंतवडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सर्वाधिक मतं सावंतवाडी शहरातून ही बाबू कुडतरकर यांच्या प्रभागातून मिळाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आपला गड राखल्याचं पाहिला मिळत आहे. त्यामुळे त्यांचा या यशस्वी कामाबद्दल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान शहरात महायुतीला 185 मताधिक्यच लीड मिळाले होते परंतु बाबू कुडतरकर यांनी आपल्या प्रभागातून सर्वाधिक लीड राणेंना मिळून दिले आहे, त्यामुळे बाबू कुडतरकर यांनी आपला गड पुन्हा एकदा राखल्याचं पाहायला मिळत आहे.
