राज ठाकरेंच्या धगधगत्या तोफेच्या तोंडी विनायक राऊत मिळाले आणि वाकोल्यात जाऊन पडले…

गणेश वाईरकर: गेल्या दहा वर्षात निष्क्रिय ठरल्यामुळे राऊत पराभव…

मालवण (प्रतिनिधी)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी बार म्हणून टीका करणारे खास. विनायक राऊत हे राज ठाकरे यांच्या तोफेच्या तोंडी मिळाले आणि थेट जाऊन वाकोल्यात पडले आहेत. वारंवार राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या विनायक राऊत यांना आता पराभवानंतर राज ठाकरे हे फुसका बार आहे की धगधगती तोफ आहेत हे समजले असेलच अशी खरमरीत टीका मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील १० वर्षे निष्क्रिय ठरल्यामुळे विनायक राऊत यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ खावी लागली. या पराभवानंतर आता विनायक राऊत हे शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून कायमचे जिल्ह्याबाहेर गेलेले दिसतील. विनायक राऊत शिवसैनिकांना सोडून कायमचे वाकोल्यात निघून गेलेत. पुढील पाच वर्षे राऊत जिल्ह्यात सापडणारही नाहीत. यापुढे विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना शंभर वेळा विचार करून बोलावे, असा थेट इशाराही मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page