आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी…

कुणाल किनळेकर: येणारा विधानसभेत जनता तुम्हाला घरी बसवणार..

⚡कुडाळ ता.०६- : लोकसभा निवडणुकीदरम्यान कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी येत्या निवडणुकीत आपल्या आमदारकीची चिंता करावी, अशी खोचक टीका मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,  गेले दहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात साडेसात वर्षे सत्ताधारी म्हणून कोणतेही ठोस असे विधायक अथवा विकास काम करू न शकणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना निवडणुका आल्या की नसलेला राजकीय दहशतवाद आठवतो. लोकसभा प्रचारादरम्यान आपण आपल्या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात खरोखरच काय विकास साधला याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविली असती तर आज आपल्या मतदारसंघात आपली पिछेहाट झाली नसती. राज साहेबांनी सभा घेतली की त्या ठिकाणचा उमेदवार पडतो अशी टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यासाठी येत्या विधानसभेत राज ठाकरेचें महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी चौक सभा घेऊन पुरा पडेल.  राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासाठी कणकवली येथे घेतलेल्या सभेनंतर जिल्ह्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेला प्रतिसाद येत्या विधानसभेपर्यंत तुम्हाला घरी बसविण्यासाठी पुरा पडेल.असे श्री. किनळेकर यांनी म्हटले आहे.
You cannot copy content of this page