⚡कणकवली ता.०५-: खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इस्वलकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जि. प. सभापती बाळा जठार, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, माजी पं स सदस्य तृप्ती माळवदे, शक्तीकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, राजू वरुणकर , सुधीर कुबल, भाऊ राणे, अंजली कुबल, रफिक नाईक आदी उपस्थित होते. प्राची इस्वलकर या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या. खारेपाटण गावविकासासाठी नीतेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. नीतेश राणे यांची कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे इस्वलकर यांनी सांगितले.
खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात पक्षप्रवेश…
