दिपक केसरकर ; हा बाळासाहेबांच्या विचारांचा कौल..
⚡सावंतवाडी ता.०४-: कोकणी जनता कोणासोबत हे नारायण राणे यांच्या विजयातून दिसून आले. बाबासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा कौल असून कोकणाने महायुतीला स्विकारले प्रतिक्रिया शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.
मंत्री दिपक केसरकर यांनी झूम अॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी राणे कुटुंबीय सौ निलम राणे, निलेश राणे, आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीने काम केले त्या सर्वांचे आभार मानतो. . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवून मिळाले आहे सिंधुदुर्गच्या जनतेही आभार
