⚡बांदा ता.०४-: भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने बांदा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी ४८ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. बांदा शहरात फटाके फोडून व नारायण राणे यांच्या जयघोषने जल्लोष करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, माजी सभापती शीतल राऊळ, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, तनुजा वराडकर, स्मिता पेडणेकर, राखी कळंगुटकर, गुरु कल्याणकर, आत्माराम गावडे, अभिषेक देऊलकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, नितेश पेडणेकर, साई सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, अक्षय मयेकर, रमेश सावळ, शुभम साळगावकर, सर्वेश मुळ्ये आदिसह भाजप व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
