दत्ता सामंत: जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष..
⚡मालवण ता.०४-: नारायण राणे यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. नारायण राणे यांचा विजय अपेक्षितच होता, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी नारायण राणे यांच्या विजयानंतर व्यक्त केली.
रत्नागिरी येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाल्यावर तेथे उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यावेळी दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दत्ता सामंत म्हणाले, १९९० सालात नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांनी विकासकामांमधून कोकणचा कायापालट केला. मात्र २०१४ साली नारायण राणे यांचा पराभव झाल्यानंतर विनायक राऊत व वैभव नाईक ही मंडळी आली. त्यांनी कोकणची दहा वर्षे फुकट घालवली. कोकण अविकसित केले. यामुळे मतदारांना कळून चुकले की राणे यांच्या शिवाय कोकणला पर्याय नाही. म्हणूनच आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने नारायण राणे यांना भरभरून मतदान करून विजयी केले. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेल्या मेहनतीमुळे हा विजय झाला आहे, असेही दत्ता सामंत म्हणाले.
