विशाल परब:राणेंच्या साथीने जिल्ह्यात रोजगार देण्याचा प्रयत्न करणार.
⚡सावंतवाडी ता.०५-: कोकणी जनतेने राणेंना दिलेली साथ या बदल मी मनापासून आभार मानत आहे. नक्कीच येणाऱ्या काळात राणेंच्या माध्यमातून तरुणांचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवू. या जिल्ह्यात मोठ्या इंडस्ट्री येऊन आमच्या तरुणांना रोजगार या ठिकाणीच कसा मिळेल ? यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला.
दरम्यान शहरात झालेल्या कमी मतदाना बाबत आम्ही आत्मपरीक्षण करून येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकीत आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करून सर्वाधिक मत शहरातून मिळवण्याचं प्रयत्न करू असा विश्वास देखील विशाल परब यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
