टोक्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांची आमरण उपोषणाची नोटीस…

नेरूर-गोंधयाळे ग्रामस्थांचे ५ जून पासून गोदामासमोर उपोषण:किडे अन्नात पडत असल्याने आरोग्याला धोका..

⚡कुडाळ ता.०३- : एमआयडीसीत असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला पडलेला टोका आसपासच्या वस्तीत पसरून नेरूर-गोंधयाळे वाडीतल्या रहिवाशाना त्रास होत आहे. दिवसेंदिवस हा त्रास वाढतच चालला आहे. म्ह्णूनच होणाराहा त्रास असह्य झाल्याने आणि याबाबत संबंधित प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ५ जून पासून एमआयडीसीतील धान्य गोदामासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय नेरूर गोंधीयाळें ग्रामस्थांनी घेतला आहे. तसे पत्र या रहिवाशांनी जिल्हाधिकारी याना दिले आहे.
कुडाळ एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र वखार महामंडळाचे धान्य गोदाम आहे. या गोदामातील धान्याला टोका नावाची कीड लागली आहे. गोदामात धान्य साथ सुद्धा अतिरिक झाल्याने या टोक्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. हे टोके लगतच्या वस्तीत पसरल्याने लोकांना त्याचा त्रास होत आहे. या कीटकांचा दंश वेदनादायी असतो त्यामुळे खाज येतेच पण हे कीटक जेवणात देखील पडतात. अन्नासोबत पोटात जातात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील उदभवला आहे.
यापूर्वी येथील रहिवाशांनी १३ मे रोजी या गोदाम प्रशासनाला या कीटकांचा बंदोबस्त करावा असे पत्र दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे रहिवाशांनी दिनांक ३० मे रोजी गोदामावर धडक देत गोदाम अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि पत्र दिले. त्यावेळी कुडाळच्या तहसीलदारानी सुद्धा याबाबत निर्णय घेण्याची सूचना गोदाम प्रशासनाला केली होती. तसेच वरिष्ठ गोदाम अधिकारी पनवेल वरून येऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाहणी करतील असेही या रहिवाशाना सांगण्यात आले होते. पण ते अधिकारी आले का, पाहणी केली का, काय उपाय योजना केल्या, याबाबत या रहिवाशांना काहीच माहिती गोदाम प्रशासनाकडून मिळाली नाही. आणि त्या कीटकांचा त्रास देखील कमी झालेला नाही त्यामुळे या रहिवाशांनी ५ जून रोजी गोदामासार आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधीकारी यांच्यासह इतर विभागांना दिलेल्या या पत्रात म्हटले आहे, अनेक वर्ष या धान्य गोडाऊन मधील धान्याला पडलेला किडा (टोका) आणि याचा नाहक त्रास जवळील वस्तीत नोकांना होत असून यावर्षी जानेवारी २०२४ पासून त्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. हा कीडा वाऱ्याने आमच्या वस्तीत वेत असून रोजच्या खाण्यापिण्यातून सर्वाच्या पोटात जात आहे. . त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा कीडा चावत असल्याने रात्रीची कुणालाही झोप नाही. . सर्वांच्या शरीराला खाज येत आहे. बऱ्याच वेळा याबाबत गोडाऊन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली तरी पण अद्याप याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे आमच्या व आमच्या मुलाबाळांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालला आहे. गांड़ाऊन मध्ये कणल्या अतिरिक्त धान्य साठ्यामुळे याचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे त्यामुळे आम्ही नेरूर गोंधीयाळें वाडीतील सर्व ग्रामस्थ एमआयडीसी गोडाऊन समार दिनांक 05/06/2024 रोजी आमरण उपोषणास बसत आहोत. असे या पत्रात म्हटले आहे.
या बाबतचे पत्र या रहिवाशानी जिल्हाधिकरी, जिल्हा पोलीस अधीक्षक,कुडाळ पोलीस ठाणे, कुडाळ तहसीलदार, नेरूर सरपंच, आरोग्य सुविधा केंद्र वालावल, आणि धान्य गोदाम अधिकारी कुडाळ याना दिले आहे.

You cannot copy content of this page