मालवण दि प्रतिनिधी
शिवसेनेच्या जडणघडणीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेना दैनंदिनी २०२४ चे प्रकाशन ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते, विभागप्रमुख – आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस. परब, साकेत शरद पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस. परब यांनी माहिती देताना शिवसेना दैनंदिनी २०२४ मध्ये शिवसेना नेते, उपनेते, शिवसेना सचिव, संघटक, प्रवक्ते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, विभाग संघटक, शाखाप्रमुख, शाखा संघटक, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख तसेच शिवसेनेच्या विविध अंगीकृत संघटना, इतर राज्यातील पदाधिकारी यांची इत्यंभूत माहिती असून ही दैनंदिनी ७ जूनपासून शिवसेना भवन येथे उपलब्ध असेल अशी माहितीही त्यांनी दिली
