वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के…

⚡वैभववाडी ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये वैभववाडी तालुक्याचा निकाल 100 टक्के लागला आहे.
अचिर्णे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी निरजा प्रदीप मांजरेकर 86% गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेचा विद्यार्थी कुमार प्रफुल प्रवीण मोरे आणि 85 टक्के द्वितीय तर शुभम दिलीप परब 84टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.
वैभववाडी तालुक्यातुन 404 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 404 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्यातील चारही शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे वैभववाडी तालुक्याचा निकाल 100 टक्के लागला आहे.
निकाल पुढीलप्रमाणे कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी शाळेचं 100 टक्के निकाल लागला आहे.
कला शाखा प्रथम क्रमांक यश बाबू शेळके 77% द्वितीय क्रमांक प्रीती विजय सावंत 76% तर तृतीय क्रमांक रिया रवींद्र मोरे ७४.५० असे एकूण 57 विद्यार्थी परिक्षेला बसले होते 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक मोरे प्रफुल प्रवीण 85.67 द्वितीय क्रमांक परब शुभम दिलीप 84.50 तृतीय क्रमांक करंजवे वैष्णवी आनंद 83.67 टक्के या शखेतुन एकुण 102 विद्यार्थी बसले होते.102 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखा प्रथम क्रमांक सुतार हर्ष सुरेश 82.83 द्वितीय खाडे हर्ष श्रीकांत 82.50 तृतीय क्रमांक चाळके अक्षता सहदेव या शाखेतुन 100 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. 100 टक्के निकाल लागला आहे.
अचिर्णे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल
विज्ञान शाखा 71 विद्यार्थी बसले होते 100 निकाल प्रथम क्रमांक कु नीरजा प्रदिप मांजरेकर 86.17 द्वितीय तन्वी राजेंद्र कदम 79.33 तृतीय सानिया सत्यवान दळवी 78.0 टक्के गुण मिळवले
वाणिज्य शाखा 31 विद्यार्थी बसले होते.100 निकाल प्रथम क्रमांक कु सानिका संतोष कदम 80.83 द्वितीय सानिया महमदनिफ रमदुल 77.17 तृतीय क्रमांक आकांक्षा संतोष गुरव 77.टके गुण मिळवले.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे शाळेचा निकाल 100 लागला असून वाणिज्य शाखा एकुण 11 विद्यार्थी बसले होते.100 टक्के निकाल प्रथम क्रमांक कु अपर्णा प्रकाश पांचाळ 67.67 द्वितीय क्रमांक सोनल अनंत कांबळे 66.67 तृतीय तन्वी संजय गुरव 67 टक्के गुण मिळविले.
कला शाखा 22 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.100 टक्के निकाल प्रथम क्रमांक कु सोनल संजय कुवळेकर 78 टक्के द्वितीय क्रमांक कृपा मंगेश सावंत 76.17 तृतीय क्रमांक सानिका संजय गुरव 67 टक्के गुण मिळवले.
माधवराव पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोकिसरे शाळेचा निकाल 100 टक्के कला शाखा 10 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.100 टक्के निकाल प्रथम क्रमांक सानिका रामकृष्ण राऊत 67.67 द्वितीय दिव्या राजेंद्र सावंत 65.67 तृतीय क्रमांक मीर पंढरी रावराणे 60 टक्के रितेश नारायण गुरव 60 टक्के गुण मिळवले आहेत

You cannot copy content of this page