⚡सावंतवाडी ता.२१-: बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आर पी डी हाय स्कूल ची गुणवंत विद्यार्थिनी कु. वैष्णवी भांगले हीचा सत्कार माजी आमदार राजन तेली साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर सरचिटणीस विनोद सावंत,बाबा काणेकर बाळा आकेरकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या चौकुळ येथील राहुल गावडे याचे देखील फोनद्वारे अभिनंदन केले
