उपाध्यक्षपदी दीपक परब निवडी बिनविरोध
*💫मालवण दि.२९-:* मुंबई येथील परब मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे परिवहन व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ऍड.अनिल परब यांची तर उपाध्यक्षपदी मसुरे चांदेर गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक डॉ श्रीकृष्ण (दीपक) परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दादर- मुंबई येथे परब मराठा समाजची वार्षिक सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेत वार्षिक अहवालाचे वाचन झाल्यानंतर वार्षिक जमाखर्चास मंजुरी देण्यात आली तसेच परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रम आयोजनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी सन २०२१-२२ ते सन २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी परब मराठा समाज नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून अनिल परब ,उपाध्यक्ष- दीपक परब, कार्याध्यक्ष – जगदीश ज. परब, सरचिटणीस -जी. एस. परब, चिटणीस – प्रमोद बा. परब, श्री शैलेंद्र ल.परब, कोषाध्यक्ष- श्री शरद ल. परब, सदस्य म्हणून आत्माराम परब, सोमा परब, संतोष परब, सुनिल परब, श्रीकांत परब, सौ प्रतीक्षा परब, श्री अभय परब, अशोक ग परब, अंकिता परब, मिलिंद प्रभू, श्री सत्यवान परब, सुप्रिया परब, श्री प्रवीण परब, श्री आशिष परब, तर अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणुन श्री सुदाम परब तसेच सल्लागार म्हणून इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन आणि आशिया पॅसिफिक आर्थोपेडिक असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. राम प्रभू, श्री प्रकाश वी परब, अशोक बा परब, श्री सत्यवान ल. परब अशी नूतन कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली. यावेळी महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक गोवा व गुजरात राज्यातील परब मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते.

