आरएसएसचे जेष्ठ निष्ठावंत यशवंत कोचरेकर यांचे निधन…

मालवण तळाशील येथील कोचरेकर भाऊ नावाने होते परिचीत;जेष्ठ समाजसेवक हरपल्याची व्यक्त होतेय भावना

*💫मालवण दि.२९-:* मालवण तालुक्यातील मूळ तळाशील गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत अर्जुन कोचरेकर यांचे निधन झाले. ते सर्वांना भाऊ नावाने परिचित होते. भाऊ यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यशवंत कोचरेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाडाचे स्वयंसेवक होते. संघाच्या माध्यमातून ते समाजात नेहमी कार्यरत असायचे. संघ कार्यासोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष अशा सर्व संघटनांमध्ये त्यांचा वावर होता. श्री हनुमान सेवा संघाचे ते संस्थापक होते.

You cannot copy content of this page