*💫बांदा दि.२८-:* महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची केंद्राच्या अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने आज तब्बल दोन तास झडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. कर्नाटक राज्यातील खाण घोटाळा प्रकरणाशी याचा संबंध असल्याची चर्चा आहे. आज होळी पौर्णिमेच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र झडतीत काय हाती लागले याबाबत सविस्तर तपशील मिळू शकला नाही. कर्नाटक राज्यातील एका बड्या उद्योगपतीचे फार्महाऊस या परिसरात आहे. बंगलोर येथील पथकाने आज सकाळीच बंगल्यात येत झाडाझडती सुरू केली. त्यावेळी बंगल्याची देखभाल करण्यासाठी असलेले दाम्पत्य त्याठिकाणी होते. स्थानिक गोवा पोलिसांना देखील याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची ईडीकडून झडती…
