शहरात ५ तर ग्रामीण भागांत ४
*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. या मध्ये शहरात न्यू खासकीलवाडा येथे एक तर सालईवाडा येथे चार रुग्ण सापडले आहेत. तर आजगाव, माजगाव, बांदा.आणि निरवडे या गावांमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ४६ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
