शिवसेनेची महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना..
⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यासह या विभागातील ट्री कटिंग, खराब झालेले वीज पोल बदलणे, आवश्यक तिथे नवीन ट्रान्सफार्मर देणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने करावीत. पावसाळ्यात ग्राहकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी महावितरण कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना केल्या. यावर श्री. मोहिते यांनी ठेकेदारांना सूचना दिल्या असून ट्री कटिंग तसेच पोल बदलण्याची कामे सध्या सुरू असल्याचे सांगितले.
कणकवली विभागातील महावितरणाया विविध समस्यांबाबत संजय आग्रे यांनी श्री. मोहिते यांच्याशी चर्चा केली. यावेळी संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण पाळेकर आदी उपस्थित होते.
